'Darknet' Drugs: डार्कनेट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालणाऱ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश ABP Majha

Continues below advertisement

'डार्कनेट' या विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशभरात चालवल्या जाणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचा एनसीबीने पर्दाफाश केलाय. या प्रकरणी एनसीबीने २२ जणांना अटक केलीय. यांत ४ महिलांचाही समावेश आहे. ड्रग्जची विक्री करणाऱ्या डीएनएम इंडिया, डीआरईडी आणि द ओरिएंट एक्स्प्रेस या ड्रग्जची विक्री करणाऱ्या तीन नेटवर्कचा भांडाफोड एनसीबीने केलाय. डार्कनेट आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून ड्रग्जचा घरपोच पुरवठा केला जात असल्याचे एनसीबीच्या तपासातून समोर आलंय. दिल्ली-नोएडा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये चार महिने तपास केल्यानंतर एनसीबीने या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. स्टेशनरी आणि बेकरी पदार्थांच्या माध्यमातून ग्राहकांना घरपोच ड्रग्ज पुरवठा करण्यात येत होता अशी माहिती एनसीबीने दिलीय. अटक करण्यात आलेले आरोपी तरुण आणि उच्चशिक्षित असल्याचे समोर आलंय. या कारवाईत एनसीबीने मोठा ड्रग्जसाठा जप्त केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola