Cyclone AMPHAN | अॅम्फान चक्रीवादळ आज प. बंगाल-ओदिशाच्या समुद्रकिनारी धडकण्याचा इशारा
Continues below advertisement
बंगालच्या खाडीत निर्माण झालेलं चक्रीवादळ अॅम्फान आज (20 मे) पश्चिम बंगालच्या दीघा आणि बांगलादेशच्या हतिया बेटाजवळ धडकण्याची शक्यता आहे. त्यावेळी वादळाचा वेग प्रतितास 185 किमी असू शकतो. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ओदिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूरसह तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर ओदिशाच्या समुद्रकिनाऱ्यावरील जिल्हे हाय अलर्टवर आहेत.
चक्रीवादळ अॅम्फान मंगळवारी (19 मे) अंशत: कमकुवत झालं असलं तरी धोका टळलेला नाही. पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांचं नुकसान होईल, एवढी ताकद या चक्रीवादळात अद्याप आहे. त्यामुळे या दोन राज्यांमधील लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
Continues below advertisement