Cyclone AMPHAN | अम्फान चक्रीवादळाचा आठ राज्यांना तडाखा बसण्याचा अंदाज
Continues below advertisement
एकीकडे देश कोरोनाच्या संकटाशी लढा देतोय, तर दुसरीकडे उत्तर-पूर्वेच्या राज्यांवर अम्फान चक्रीवादळाचं संकट घोंगावतंय. पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांना हाय अलर्टही देण्यात आलाय. बंगालच्या खाडीतून निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाचा बंगाल आणि ओडिशाच्या दिशेनं वेगाने प्रवास सुरु झालाय...पुढच्या 12 तासात हे वादळ आणखी अक्राळ विक्राळ रुप धारण करु शकते. या वादळाचा वेग 200 किलोमिटर प्रति तास असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलंय..यामुळे मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवली जातेय. एकंदरीतच ८ राज्यांना या अम्फान चक्रीवादळाचा तडाखा बसण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत काल बैठकही घेण्यात आली. यात गृह मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारीही उपस्थित होते.
Continues below advertisement