Covid-19 Vaccination India | आता 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस घेता येणार

नवी दिल्ली : एक एप्रिलपासून 45 वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. तसेच देशात लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कोरोना लसीची कोणताही तुतवडा भासणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

कोरोना महामारीची दुसरी लाट देशात जोर धरत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकार कोरोनापासून कसा बचाव करता येईल यावर पूर्ण लक्ष देत आहे. त्यासाठी लस हा सर्वात उत्तम मार्ग आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola