Corona Vaccine | भारत बायोटेक-आयसीएमआरच्या Covaxin लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी
कोरोनाची लस विकसित करणारी भारत बायोटेकची कोवॅक्सिन या लसीच्या पहिला टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाली आहे. कोवॅक्सिनच्या सुरुवातीच्या ट्रायलमधून माहिती मिळाली आहे की ही लस सुरक्षित आहे. कोवॅक्सिनवर संशोधन करणाऱ्या संशोधकांनी ही माहिती दिली. भारताच्या 12 शहरांमधील 375 स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी केली जात आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला कोवॅक्सिनचे दोन डोस देण्यात आले असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात नागपूर आणि बेळगावात या लसीची चाचणी सुरु आहे.