Covishield आणि Covaxin च्या Mix Dose वर अभ्यास करण्यास DGCI ची मंजुरी, मिस्क डोस परिणामकारक : ICMR
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या मिक्स डोसवर अभ्यास करण्यास डीजीसीआयची मंजुरी दिली आहे. 'मिक्स डोस' परिणामकारक असल्याचा निष्कर्ष आयसीएमआरच्या अभ्यासात काढण्यात आला होता. उत्तर प्रदेशात चुकून ज्यांना वेगवेगळ्या लशीचे दोन डोस दिले होते, त्यांचा अभ्यास आयसीएमआरनं केला होता. आता ज्या चाचण्या होणार आहेत त्या वेगळ्या आहेत. या अभ्यासात ३०० स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड लशीचे डोस देऊन त्याचा प्रभाव तपासला जाणार आहे.