#Corona फेब्रुवारी 2021मध्ये भारतातला कोरोना संपणार! केंद्र सरकारनं नियुक्त केलेल्या समितीचा दावा
नवी दिल्ली : भारतातील कोरोना व्हायरस महामारीचं संकट सर्वोच्च पातळीवर जाऊन आलं आहे आणि आणि कोरोनाचं संकट हळूहळू कमी होताना दिसत आहे. यावर सरकारने नेमलेल्या वैज्ञानिकांची समितीचा दावा आहे की, कोरोना महामारी फेब्रुवारी 2021 पर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, भारतात कोरोनाबाधितांचा संख्या एक कोटी सहा लाखांपेक्षा जास्त होणार नाह. सध्या भारतात कोरोनाबाधितांची संख्या 75 लाखांहून अधिक आहे. एका इंग्रजी वृत्तापत्राला दिलेल्या माहिती या समितीने म्हटलं की, कोरोना व्हायरस रोखण्यासाठी घेत असलेल्या उपाययोजना सुरू ठेवल्या पाहिजेत.
Tags :
Covid 19 Death New Corona Patients India Covid Death Maharashtra Corona Corona Coronavirus Covid 19