Coronavirus Update | देशात गेल्या 24 तासात सर्वाधिक 8380 कोरोना रुग्णांची वाढ

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासात 8 हजार 380 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 193 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख  82 हजार 143 झाली आहे. त्यापैकी 5 हजार 164 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 86 हजार 983 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात 4 हजार 613 कोराना रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 47.75 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण 89 हजार 995 आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola