Coronavirus | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 वर

Continues below advertisement
देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होता आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 38 हजार 845 झाला आहे. यासोबतच कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासात 6 हजार 977 कोरोनाबाधित वाढले. आतापर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे. तर मागील 24 तासात 154 मृत्यूमुखी पडले. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 हजार 21 जणांचा मृत्यू झाला असून 57 हजार 721 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 41.57 टक्के आहे. तर मागील 24 तासांत 3 हजार 280 कोरोनामुक्त झाले.भारतात सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 77 हजार 103 आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram