
Coronavirus | कोरोना विषाणूचा हवेतून संसर्ग, मास्क प्रभावी शस्त्र : डॉ. शेखर मांडे
Continues below advertisement
कोरोना विषाणूचा हवेतून संसर्ग होऊ शकतो. कोरोनाबाधित रुग्ण खोकल्यास किंवा शिंकल्यास विषाणूचा हवेतून प्रसार होईल. त्यासाठी मास्कच प्रभावी आहे, अशी माहिती सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी दिली. तसंच वॉल्व्ह असलेले मास्क धोकादायक असून ते न वापरण्याचा सल्लाही डॉ. शेखर मांडे यांनी दिला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाशी त्यांनी संवाद साधला.
Continues below advertisement