Corona Vaccine | भारतात जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची शक्यता : सीरमचे सीईओ अदर पुनावाला

Continues below advertisement

 भारतात जानेवारीपासून कोरोना लसीच्या लसीकरणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लसीकरणासंदर्भात सीरम इन्स्टिट्युटच्या अदर पुनावाला यांच्याकडून संकेत देण्यात आले आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत सीरमच्या कोरोनावरील लसीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असं अदर पुनावाला यांनी सांगितलं आहे. ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलताना अदर पुनावाला यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

जानेवारीपासून भारतात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. अदर पुनावाला यांनी एका ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलताना सांगितलं की, या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच, डिसेंबर अखेरपर्यंत एसआयआयला वॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळू शकते. परंतु, या लसीच्या वापरासाठी परवानगी नंतर मिळू शकते. यावेळी बोलताना त्यांनी, जानेवारी, 2021 मध्ये भारतात कोरोना लसीच्या लसीकरणाच्या अभियानाला सुरुवात होऊ शकते, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

पुनावाला यांनी सांगितलं की, त्यांची कंपनी केंद्र सरकारसोबत खासगी बाजारासाठी कोरोना लसीचे डोस तयार करीत आहे. केंद्र सरकारचा पुढच्या वर्षी जुलैपर्यंत लसीचे 30 ते 40 कोटी डोस खरेदी करण्याचा मानस आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची 20 ते 30 टक्के लोकसंख्येला कोरोनाच्या लसीचा डोस देण्याची योजना आहे. त्यांनी शक्यता वर्तवली आहे की, पुढच्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत देशातील एकूण लोकसंख्येपैकी एका मोठ्या वर्गाला कोरोना लसीचा डोस देण्यात येईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram