Corona Omicron BF.7 Variant New Guidelines : कर्नाटकमध्ये मास्क परतले, राज्यातही निर्बंध लागू होणार?

Continues below advertisement

Corona Omicron BF.7 Variant New Guidelines : कर्नाटकमध्ये मास्क परतले, राज्यातही निर्बंध लागू होणार?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत भारतात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. दवाखान्यांमध्ये बेडची, ऑक्सिजनची, औषधींच्या कमतरतेमुळे देशात विदारक चित्र निर्माण झालं होतं...कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे ही सर्व परिस्थिती निर्माण झाली होती. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरु असल्याचं दिसतंय, वुहान आणि इतर काही शहरांमध्ये लॉकडाऊन सारखे निर्णय घेतल्यानं जगाची चिंता वाढवलीय. यानंतर आता केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना नव्या व्हेरीअंटच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सुचना केल्या आहेत. देशभरात ख्रिसमसच्या सट्टया आणि नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र आता ओमिक्रॉनच्या BF 7 व्हेरीअंटमुळे पुन्हा एकदा निर्बंध लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या शेजारीच असलेल्या कर्नाटक राज्याने नव्या व्हेरीअंटच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लागू केलेत "कर्नाटकात चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यालयात, मास्क अनिवार्य पब, रेस्टॉरंट आणि बारमध्येही नवीन वर्षाच्या पार्ट्यांमध्ये मास्क अनिवार्य" 31 डिसेंबरला रात्री एक वाजेपर्यंतच हॉटेल रेस्टॉरंटला परवानगी देण्यात आली. त्यामुळे आता महाराष्ट्रातही निर्बंध लागू होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सण उत्सव काळजी घेऊन साजरे करा असं आवाहन जनतेला केलंय.एकुणच या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आता निर्बंध लागू करण्यात येणार का हे पाहणं महत्वाचंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram