Corbevax Vaccine : 12 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा होणार? कोर्बेव्हॅक्स लशीबाबत आज निर्णय
Continues below advertisement
१२ वर्षांवरील मुलांना लसीकरणाला हिरवा कंदील मिळणार की नाही याचा निर्णय तज्ज्ञ समिती आज घेणार आहे. बायोलॉजिकल-ई कंपनीच्या कोर्बेव्हॅक्स लशीच्या आपत्कालिन वापरासाठी औषध नियामक प्रशासनाची तज्ज्ञ समिती आज निर्णय देणार आहे. या लशीला मान्यता मिळाली तर १२ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण करणं शक्य होणार आहे. तसं झालं तर पुढच्या शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी १२ वर्षांवरील शालेय विद्यार्थ्यांचं लसीकरणाचा मार्ग मोकळा होईल.
Continues below advertisement