Congress Shanti March | दिल्लीत काँग्रेसचं संविधान बचाओ, भारत बचाओ मार्च | ABP Majha
देशातील सर्वात जुना आणि मोठ्या पक्षांपैकी एक अससेल्या काँग्रेसचा आज स्थापना दिवस आहे. पक्षाच्या स्थानपादिनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेस आज देशभर विरोध प्रदर्शन करणार आहे. देशभरातील विविध राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये 'संविधान बचाओ-भारत बचाओ' मार्चचं आयोजन करण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज काँग्रेस मुख्यालयात सकाळी 9.15 वाजता झेंडा फडकवतील. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल. काँग्रेसचे सर्व राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकारी विविध राज्यांत आयोजित करण्यात आलेल्या आजच्या मार्चमध्ये सहभागी होणार आहेत.