Congress : काँग्रेसमध्ये आजपासून खरगे पर्व, मलिक्कार्जुन खरगे स्वीकारणार पदभार

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज पदभार स्वीकारणार आहेत. त्याआधी खरगे यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. खरगे आज सकाळी सोनिया गांधी, राहुल गांधी, आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारणार आहेत. 24 वर्षानंतर प्रथमच गांधी कुटुंबाबाहेरची व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होतेय. अडचणींचा सामना करणाऱ्या काँग्रेसचं नेतृत्व करताना खरगे यांच्यासमोर मोठी आव्हानं आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola