Salman Khurshid | विद्यार्थ्यांच्या मदतीला पोलीस का धावले नाहीत? काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचा सवाल | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जेएनयूतल्या साबरमती हॉस्टेलमध्ये काल तोंड झाकून आणि हातात लाठ्या-काठ्या घेऊन अज्ञातांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केलाय. त्यात जेएनयू विद्यार्थी संघाची अध्यक्षा आयेशी घोषसह १८ जण गंभीर जखमी झालेत...जखमींना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल कऱण्यात आलंय.हातात लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या जमावानं हॉस्टेलचीही तोडफोड केलीए. एम्समध्ये दाखल जखमी विद्यार्थ्यांची रात्री उशिरा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी विचारपूस केली... दरम्यान, या हल्ल्यावरुन डावे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेत.
विद्यार्थ्यांवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा पोलीस मदतीला का धावले नाहीत, असा सवाल काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी उपस्थित केलाय...
विद्यार्थ्यांवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा पोलीस मदतीला का धावले नाहीत, असा सवाल काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी उपस्थित केलाय...