Gas Cylinder : इंडियन ऑईलकडून रेस्टॉरन्ट मालकांना भेट, व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची कपात

Continues below advertisement

इंडियन ऑइलने हॉटेल, रेस्टॉरन्ट मालकांना नववर्षाची भेट दिलीय. इंडियन ऑईलने  व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याआधी डिसेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. डिसेंबरमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात 100 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही ही जनतेसाठी दिलासादायक बाब होती. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाल्याने रेस्टॉरंट मालकांना दिलासा मिळालाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram