CNG PNG Price Hike : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता ABP Majha
एकीकडे रिझर्व बँकेनं रेपो रेट वाढवल्यानं कर्जाचे हप्ते महागणार आहेत. तर दुसरीकडे आता सणासुदीच्या तोंडावर गॅस दरवाढ होण्याचीही शक्यता आहे. जागतिक बाजारात गॅसचे दर विक्रमी ४० टक्क्यांनी वाढल्यानं पीएनजी आणि सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायूच्या किंमती वाढल्यानं दरांचा आढावा घेतला जातोय. नैसर्गिक वायूच्या किंमतीत मोठी वाढ झाल्यानं सीएनजी आणि पीएनजीची दरवाढ अटळ मानली जातेय.