Cloudburst in J&K | कठुआमध्ये ढगफुटी, ४ ठार; किश्तवाडच्या घटनेची पुनरावृत्ती?

जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीच्या घटनांनी पुन्हा चिंता वाढवली आहे. कठुआ जिल्ह्यात तीन ठिकाणी ढगफुटी झाली आहे. या ढगफुटीमध्ये आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. जोख घाटीमध्ये झालेल्या ढगफुटीत चौघांचा बळी गेला. मथुरेचकबगाड्चगंडादिलवानफुल्ली या ठिकाणीही ढगफुटीची नोंद झाली आहे. यापूर्वी चौदा ऑगस्ट रोजी किश्तवाडमध्ये झालेल्या ढगफुटीत जवळपास पासष्ठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा ही ढगफुटीची घटना घडली आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. बचावकार्य सुरू आहे. ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola