Chinese App : कर्जाच्या नावाखाली खंडणी, चीनी अॅपच्या माध्यमातून 350 कोटींचा घोटाळा

कर्जाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना देशात काही नव्या नाहीत मात्र अशा घटनांमागे आता चीनचा हात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय...चायनीज अॅपच्या माध्यामतून कर्जाच्या नावाखाली खंडणी उकळण्याच्या प्रकाराचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय... कर्जवसुलीच्या नावाखाली धमकावणाऱ्या टोळक्यांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केलेय. देशभरात या घोटाळ्याची व्याप्ती जवळपास ३५० कोटींच्या घरात असून या प्रकरणात आता ५ कंपन्यांच्या संचालकांसह १४ जणांना ताब्यात घेण्यात आलंय. आरोपी क्रिप्टो करन्सीच्या माध्यामातून गैरव्यवहारातली रक्कम परदेशात पाठवत असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी चीनी नागरिकांच्या संपर्कात असलेल्या एका अनुवादक महिलालाही ताब्यात घेण्यात आलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola