हेरगिरीखोर चीनचं भारतीय अर्थव्यवस्थेवरही लक्ष; स्टार्टअप अॅप्स आणि ई-कॉमर्स कंपन्यांवर चीनची पाळत
Continues below advertisement
हेरगिरीखोर चीनची आता आणखी एक कुरापत समोर आली आहे. चीन करत असलेल्या भारताच्या हेरगिरीबाबत आता आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. चीन आता भारतीय अर्थव्यवस्थेवरही लक्ष ठेवून असल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने दिलं आहे. या वृत्तानुसार, भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपाठोपाठ चीन भारतातील स्टार्टअप अॅप्स आणि ई-कॉमर्स कंपन्यांवरही पाळत ठेवत असून पेमेंट अॅप्स, सप्लाय चैन, डिलीवरी अॅप्स आणि या अॅप्सचे सीईओ-सीएफओसह जवळपास 1400 व्यक्ती आणि संस्थांवर पाळत ठेवून असल्याची माहिती समोर आली आहे.
Continues below advertisement