India-China Dispute : अरुणाचल भारताचाच भाग , अमेरिकेन संसदेत ठराव : ABP Majha
Continues below advertisement
भारत-चीन वादात पहिल्यांदाच अमेरिकेनं औपचारिकरित्या भारताची बाजू घेतली आहे.. अरुणाचल प्रदेश हा भारताचाच भाग आहे.. मॅक-महोन रेषा हीच भारत आणि चीनमधील सीमा आहे, असा ठराव अमेरिकेच्या संसदेनं पारित केला आहे.. आंतरराष्ट्रीय संबंध क्षेत्रात ही अतिशय मोठी घडामोड आहे. भारतानं चीनविरोेधात उचललेल्या पावलांचं कौतुकही अमेरिकेनं केलंय. प्रशांत महासागरात चीन आक्रमक भूमिका घेत असताना, अमेरिकेनं भारताच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणं गरजेचं आहे, अशा स्पष्ट शब्दांत अमेरिकेनं भारताची बाजू घेतली आहे.
Continues below advertisement