Children Vaccine : मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, Covaxin च्या आपातकालीन वापराची DCGI कडे शिफारस

Covaxin : देशातील कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) कार्यक्रम शंभर कोटी डोसच्या उंबरठ्यावर पोहोचला असताना आणखी एक दिलासादायक बातमी आली आहे. आता लहान मुलांसाठीच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा होत असून दोन ते 18 वर्षाच्या मुलांना कोरोनाची लस लवकरच मिळणार आहे. भारत बायोटेकने तयार केलेली कोवॅक्सिन (Covaxin) लस लहान मुलांना देण्यात यावी अशी शिफारस सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola