Child Vaccine: 18 वर्षांआतील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळण्याचा मार्ग मोकळा ABP Majha
जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्होवॅक्स लसीच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिली आहे. सीरम इन्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत कोवोव्हॅक्स ही लस निर्णायक भूमिका बजावणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिननंतर वापराची मंजुरी मिळणारी कोव्होव्हॅक्स ही भारतातील तिसरी लस आहे. या लशीच्या आपत्कालीन वापराला मान्यता मिळाल्यामुळं १८ वर्षाखालील मुलांच्या लसीचा मार्ग सुकर झाला आहे
Tags :
India Serum Institute Vaccine Who World Health Organization Company COVOVAX Role Vaccine Usage Emergency Approval Other Punawala Clear Covacin