Home Minister Amit Shah यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू, 7 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
26 Sep 2021 12:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या निवासस्थान वर्षाहून सकाळी 6.30 च्या दरम्यान दिल्लीसाठी रवाना झाले. दिल्लीत दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक होणार आहे. नक्षलवादवर चर्चा करण्यासाठी केंद्राकडून बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. नक्षलवादी क्षेत्राच्या विकास कामाला गती देण्यासह अनेक मुद्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.