Chennai Flood : मिचाँग चक्रीवादळामुळे चेन्नई शहर आणि परिसरात पावसाचं थैमान, वीजपुरवठा खंडीत

मिचाँग चक्रीवादळामुळे चेन्नई शहर आणि परिसरात पावसानं थैमान घातलंय. शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. रविवारी पावसाचा जोर इतका होता की रनवेसह विमानतळाचे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. चेन्नईच्या मीनमबाक्कम भागात रविवारी रात्री १९६ मिलिमीटर पाऊस झाला. शहरातील बहुतांश भागांमध्ये काल रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. मिचाँग चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागरात चेन्नईजवळ पोहचलं आहे. काही तासांत हे चक्रीवादळ चेन्नईवर धडकण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. चेन्नईसह चेंगलपट्टू, कांचीपुरम, नागपट्टीनम आणि कडलोर जिल्ह्यांना देखील पावसाचा तडाखा बसला आहे. सर्वाधिक फटका तिरुवाल्लूर जिल्ह्याला बसला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola