Chandrayaan 3 :अवघ्या काही तासांत चंद्रयान 3 चंद्रावर लँड होणार, उद्या 5.45 मिनिटांनी होणार चंद्रावर लँड

Continues below advertisement

 भारताच्या चांद्रयान-३ संदर्भातली... संपूर्ण भारताचं लक्ष लागलंय ते भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेकडे. कारण आता लँडिंगचं काऊंटडाऊन सुरू झालाय आणि उद्या म्हणजेच २३ ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4  मिनिटांनी चांद्रयान-३ चंद्रावर उतरणार आहे.
लँडर मॉड्युलसोबत अवकाशातून आणि जमिनीवरून अखंड संपर्काची तयारी पूर्ण झालीय. भारतासाठी हा क्षण गौरवाचा आणि अभिमानाचा असेल. सध्या चांद्रयान-३ चंद्रापासून अवघ्या २५ किलोमीटवर असून लँडिंगची तयारी सुरू आहे. दरम्यान, रशियाच्या लुनाबाबत दोन दिवसांपूर्वी झालेली दुर्घटना आणि भारताच्या चांद्रयान-२चा मागचा अनुभव लक्षात घेता इस्रोनं मोठी काळजी घेतलीय. विक्रम लँडरच्या मागे, पुढे आणि वरील बाजूस अँटेना जोडण्यात आलेत. त्यामुळे लँडर मॉड्युलच्या स्थितीच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट नियंत्रण कक्षाला मिळतील. चांद्रयान-३च्या लँडिंगपूर्वी दोन तास अगोदर आढावा घेतला जाईल आणि लँडिंगसाठी वातावरण पोषक नसेल तर लँडिंग २७ ऑगस्टपर्यंत लांबणीवर जाऊ शकतं, अशी माहिती इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram