Chandrayaan-3 : भारतासह जगाचं लक्ष चांद्रयान-३च्या लॅण्डिंगकडे, लॅण्डिंगची तयारी सुरु : ABP Majha

Continues below advertisement

आज २३ ऑगस्ट २०२३. आजचा दिवस आणि संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांची वेळ, भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. कारण याच क्षणी भारताच्या भाळी ऐतिहासिक यशाचा टिळा लागणार आहे. याला कारण ठरतंय भारताची चांद्रयान-३ मोहीम. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं भारताचं चांद्रयान-३ आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांच्या ठोक्याला चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे. भारतासाठी अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि गौरवाची असलेली चांद्रयान-३ मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आहेत. चांद्रयान-३च्या सॉफ्ट लॅण्डिंगचं काऊंटडाऊन काल संध्याकाळपासून सुरू झालंय. लँडर मॉड्युलसोबत अवकाशातून आणि जमिनीवरून अखंड संपर्काची तयारी पूर्ण झालीय. या क्षणाला चांद्रयान-३ चंद्रापासून अवघ्या १५ मैलावर असून लँडिंगची तयारी सुरू झालीय. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर सूर्योदयाला सुरुवात होईल आणि चांद्रयानाचं सॉफ्ट लॅण्डिंग होईल. २०१९ मधील चांद्रयान-२चा अनुभव लक्षात घेऊन इस्रोनं चांद्रयान-३ साठी संपूर्ण काळजी घेतली. विक्रम लँडरच्या मागे, पुढे आणि वरील बाजूस अँटेना जोडण्यात आलेत. त्यामुळे लँडर मॉड्युलच्या स्थितीच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट नियंत्रण कक्षाला मिळतील. चांद्रयान-३च्या लँडिंगपूर्वी दोन तास अगोदर आढावा घेतला जाईल आणि लँडिंगसाठी वातावरण पोषक नसेल तर लँडिंग २७ ऑगस्टपर्यंत लांबणीवर जाऊ शकतं, अशी माहिती इस्रोनं दिलीय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram