Chandrayaan 3 Celebration : चांद्रयान 3 यशस्वी, अनेक ठिकाणी फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा

भारताच्या चांद्रयानाने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि देशभरात एकच जल्लोष सुरू झाला. अनेक ठिकाणी फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात तिरंगा फडकवत अनेकांनी जल्लोष केलाय. अनेकांनी ऐकमेकांना पेढे वाटले, कुणी देवळात जाऊन आरती केली. तर कुणी ढोल-ताशे वाजवून, नाचत आनंद व्यक्त केला. पुणे, रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर आणि शिर्डीमध्ये जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं... अनेकांनी फुगड्या घालून आपला आनंद व्यक्त केला तर काहीजणांना उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडून भारत माता की जयच्या घोषणा दिल्या..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola