GST : केंद्र सरकारने महाराष्ट्राला 14 हजार 145 कोटींचा जीएसटी परतावा ABP Majha
Continues below advertisement
केंद्र सरकारने सर्व राज्यांना ३१ मे २०२२पर्य़ंतचा जीएसटी परतावा दिलाय. सर्व राज्यांना ८६ हजार ९१२ कोटी रुपयांचा जीएसटी परताव्याचं वितरण करण्यात आल्याचं केंद्राकडून सांगण्यात आलंय. केंद्राच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राला १४ हजार १४५ कोटी रुपये तर गोव्याला १ हजार २९१ कोटी रुपये भरपाईपोटी देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यांना आर्थिक दिलासा मिळालाय.
Continues below advertisement