Vaccine : कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय लसीकरण केलं जाऊ शकत नाही, केंद्र सरकारची माहिती
Continues below advertisement
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला काल एक वर्ष पूर्ण झालं. या कालावधीमध्ये १५७ कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्वाची माहिती दिलीय. कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याचं लसीकरण केलं जाऊ शकत नाही असं सरकारने न्यायालयात सांगितलंय. तसंच लसीकरणादरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय बळजबरीने लसीकरण करण्यात आलेले नाही, असं केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलंय. लसीकरण अनिवार्य करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे केली होती. दरम्यान, लसीकरणाचं प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचे कोणतेही नियम आम्ही लागू केलेले नाहीत, असं केंद्राने म्हटलंय.
Continues below advertisement
Tags :
Vaccination Corona Mumbai India Vaccination Vaccination Drive Omicron Central Government On Vaccination