IT Return : आयटी रिटर्न भरण्यासाठी केंद्र सरकारनं मुदतवाढ ABP Majha

Continues below advertisement

करदात्यांना लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यासाठी आणि त्याचं रिटर्न म्हणजे विवरणपत्र भरण्यासाठी केंद्र सरकारनं मुदतवाढ दिलीय. त्यामुळे लेखा परीक्षण अहवाल आता १५ जानेवारीऐवजी १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन सादर करता येणार आहे. तर रिटर्न १५ फेब्रुवारीऐवजी १५ मार्चपर्यंत फाईल करता येणार आहे. कोरोनाचं संकट आणि आयटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी यामुळे ही मुदतवाढ देण्यात आलीय. वैयक्तिक करदात्यांसाठी आयकर रिटर्न भरण्याची मुदत ३१ डिसेंबरला संपुष्टात आली असून ती वाढवण्यात आलेली नाही.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram