CDS Bipin Rawat Helicopter Crash: हेलिकॉप्टर कोसळलेल्या कुन्नुरमधल्या टेकडीवर एबीपीची टीम

Continues below advertisement

सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा काल तामिळनाडूतील कुन्नुर येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालंय. आज त्यांचं पार्थिव दिल्लीत आणण्यात येणार आहे. उद्या त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ निलगिरीच्या डोंगराळ भागात भारतीय वायूदलाचं हेलिकॉप्टर कोसळलं आणि त्यात सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग यांच्यासह १३ अधिकारी आणि जवानांचंही निधन झालं. या दुर्घटनेबाबत उच्चस्तरिय चौकशीचे आदेश देण्यात आलेत आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या दुर्घटनेप्रकरणी संसदेत माहिती देणार आहेत. दरम्यान सध्याचे एअर चीफ मार्शल विवेकराम चौधरी हे हेलिकॉप्टर कोसळलेल्या ठिकाणी दाखल झाले आहेत. हेलिकॉप्टर  दुर्घटनेचं नेमकं कारण काय हे शोधण्याचं आव्हान आता वायुसेनेसमोर असणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram