CBSE 12th Exam : बारावीच्या मूल्यमापनासाठी CBSE चा फॉर्म्युला जाहीर, असा तयार होणार निकाल

Continues below advertisement

नवी दिल्ली : बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सीबीएसईकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून त्यानुसार सीबीएसई बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामध्ये दहावी, अकरावी आणि बारावीचे 30:40:40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. तसेच सीबीएईने 31जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचं जाहीर केलं आहे.   

बारावीच्या घटक, सत्र आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामध्ये बारावीच्या पाच विषयांपैकी तीन विषयांतील चांगले मार्क्स ग्राह्य धरण्यात येणार आहेत, तसेच दहावी, अकरावी आणि बारावीचे 30:40:40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

कोरोना महामारीमुळे 1 जून रोजी सीबीएसई बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता बारावीच्या परीक्षेचं मूल्यमापन कसं केलं जाणार याची चर्चा सुरु होती. याता त्या संदर्भात सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात बारावीच्या परीक्षेच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सादर केला आहे.  

हा बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला जरी सीबीएसईने जाहीर केला असला तरी बारावीच्या परीक्षेच्या आधारे मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षा कोणत्या गुणांच्या आधारे होणार हे अद्याप अस्पष्ट आहे. 

देशभरात निकालाचा एकच पॅटर्न असावा अशी मागणी होत असते. त्यामुळे सीबीएसईचा हा पॅटर्न आता राज्यांकडून फॉलो करण्यात येतो का ते पहावं लागेल. आतापर्यंत बहुतांश राज्यांनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram