CBSE Exams: सीबीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, दोन सत्रात पार पडणार परीक्षा
Continues below advertisement
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलंय. पहिल्यांदाच सीबीएसई बोर्डाची परीक्षा दोन सत्रात होणार आहे. कोरोना संकटामुळे गेल्या वेळेप्रमाणे बोर्ड परीक्षा रद्द होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा दुप्पट परीक्षा केंद्र असतील. पहिल्या सत्रामधील परीक्षेत विद्यार्थ्यांना फक्त ऑब्जेक्टिव प्रश्न विचारण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा मार्च- एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेत ऑब्जेक्टिव आणि सब्जेक्टिव असे दोन प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
Continues below advertisement