Coronavirus | CBSE च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा लांबणीवर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षांचं नवं वेळापत्रक ३१ मार्चनंतर जाहीर करण्यात येईल, असं सीबीएसईने जाहीर केलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अलिकडेच सीबीएसईला याबाबत निर्देश दिले होते.