CBSE 10th Result | उद्या सीबीएसईचा दहावीचा निकाल; मनुष्यबळ विकासमंत्री पोखरियाल यांची माहिती
CBSE Class X Result 2020 दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ निर्माण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्वीटवरून ही घोषणा केलीय. त्यांच्या या ट्वीटरवरील घोषणेने सीबीएसई दहावीचा निकाल कधी लागणार याविषयीची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासाठी आता फक्त 24 तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.