CBI Raids Lalu Prasad Yadav : राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित 17 ठिकाणी सीबीआयचे छापे

चारा घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना गेल्या महिन्यात जामीन मिळालाय. मात्र आता पुन्हा एकदा लालूंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लालूप्रसाद यादव यांच्याशी संबधित १७ ठिकाणी सीबीआयने छापेमारी सुरु केलीय. लालू यादव आणि त्यांच्या मुलीविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. लालू रेल्वेमंत्री असताना हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली आणि बिहारमध्ये ही सीबीआयची छापेमारी सुरु आहे. लालू यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या निवासस्थानीसुद्धा सीबीआयचे पथक पोहोचलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola