CBI Raids Tejaswi Yadav Mall : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या मॉलवर सीबीआय छापे
बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आता सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांवर सीबीआनं कारवाई सुरू केलीय. बिहारमध्ये सकाळपासून सुरु असलेल्या छाप्यानंतर आता उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या गुरुग्राममधील मॉलवरही छापा टाकण्यात आलाय. गुरुग्राममधील अर्बन क्यूबस मॉलमध्ये ही छापेमारी सुरु आहे. सकाळी राजद चे कोषाध्यक्ष आणि आमदार सुनील सिंह यांच्या घरी सीबीआयनं छापेमारी सुरु केली. तर राजद खासदार फैयाज अहमद आणि अश्फाक करीम यांच्या घरीही सीबीआयनं छापा टाकलाय. याशिवाय राजदचे माजी आमदार सुबोध राय यांच्या घरावरही सीबीआयनं छापा टाकलाय. बिहारमध्ये बहुमत चाचणीच्या आधी ही छापेमारी सुरु झाली. जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्यात ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.