Rafale Scam : राफेल विमान खरेदीत मध्यस्थाला 65 कोटी! फ्रान्सच्या 'मीडियापार्ट' पोर्टलचा गौप्यस्फोट
भारताने खरेदी केलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारात मध्यस्थाला ६५ कोटींची लाच देण्यात आली होती असा गौप्यस्फोट मीडियापार्ट या फ्रेंच पोर्टलनं केलाय. लाचखोरीच्या पुराव्याचे कागदपत्रे असतानाही सीबीआय आणि ईडीने तपास केला नाही असा आरोपही मीडियापार्टने केलाय.