Rahul Gandhi Census : काँग्रेसशासित चार राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना करण्यात येणार

काँग्रेसशासित चार राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना करण्यात येणार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी आज तशी घोषणा केली. छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री याबाबत लवकरच औपचारिकरित्या निर्णय जाहीर करतील, असं राहुल म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे, काँग्रेसचे चार पैकी तीन मुख्यमंत्री ओबीसी आहेत, भाजपचा केवळ एक मुख्यमंत्री ओबीसी आहे असं विधान देखील राहुल यांनी केलं

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola