National Education Policy | नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Continues below advertisement

देशासाठी आजचा दिवस अतिशय मोठा आणि महत्त्वाचा ठरला आहे. आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे देशातील शिक्षणव्यवस्थेचा चेहरामोहरा पूर्णत: बदलणार आहे. आज दुपारी चार वाजता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल हे एकत्रित पत्रकार परिषद घेऊन या धोरणाविषयी माहिती देणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात नेमके कोणते बदल करण्यात आले आहेत, याची उत्सुकता आहे. यासोबत केंद्रीय मनुषबळ विकास मंत्रालयाचं नाव बदलून शैक्षणिक मंत्रालय करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram