Buddhadeb Bhattacharya: ज्येष्ठ माकप नेते भट्टाचार्य यांच्याकडून पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार
Continues below advertisement
देशांतील सर्वांत मानाच्या पुरस्कारांपैकी एक असणारे पद्म पुरस्कारांचे (Padma Awards) मानकरी नुकतेच जाहीर करण्यात आले. आज (25 जानेवारी) म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 128 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री राहिलेले बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadeb Bhattacharjee) यांना देखील केंद्रातर्फे पद्मभूषण पुरस्काराचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आलं. पण त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास थेट नकार दिला आहे. पुरस्कारांची घोषणा होताच काही वेळातच त्यांनी हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं सांगितलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Republic Day West Bengal Padma Awards Announced Former Chief Minister Buddhadeb Bhattacharya Rejection