Nirbhaya Case | निर्भयाच्या मारेकऱ्यांची फाशी लाईव्ह दाखवण्याची मागणी | ABP Majha
दिल्ली येथील निर्भया प्रकरणातील दोषींना २२ जानेवारीला होणाऱी फाशी लाईव्ह दाखवण्याची मागणी पीपल अगेन्स्ट रेप इन इंडिया अर्थात परी या सामाजिक संस्थेनं केलीए. परी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा योगिता भयानी यांनी तसं पत्र केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना लिहिलं आहे. निर्भयाच्या चारही मारेकऱ्यांना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशी होणार आहे. त्यामुळे परी संस्थेची फाशीची शिक्षा लाईव्ह दाखवण्याच्या मुद्द्यावरुन आता देशभरात पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे फाशी लाईव्ह दाखवल्यानं नराधमांना खरंच जरब बसेल का? हा ही मुद्दा उपस्थित होतोय.