Brain Fog : ओमायक्रॉनवर मात केलेल्या रुग्णांमध्ये 'ब्रेन फॉग' चा धोका ABP Majha
ओमायक्रॉन व्हेरियंटमध्ये तीव्र लक्षणं नसल्यानं बेफिकीरीनं वागणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ओमायक्रॉनवर मात केलेल्या रुग्णांमध्ये 'ब्रेन फॉग'चा धोका संभावण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांमध्ये ब्रेन फॉग हे लक्षण दिसलं होतं. मात्र आता ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्यांमध्ये ब्रेन फॉग दिसून आलंय. ब्रेन फॉगशिवाय अन्य काही गंभीर लक्षणंही ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्यांच्यात दिसून आली आहेत. ओमायक्रॉन संसर्गानंतर रक्तात प्रथिनांच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आलेय त्यामुळे हृदयावर ताण येऊन हृदयाची रक्ताभिसरण क्षमता घटत असल्याचं दिसून आलंय. तसंच फुफ्फुसं आणि किडन्यांची कार्यक्षमता २-३ टक्क्यांनी घटण्याची तज्ज्ञांना भीती आहे. त्यामुळे ओमायक्रॉनला गृहीत धरू नका, या संसर्गानंतर रुग्णालायात दाखल होण्याचं प्रमाण किंवा तीव्र लक्षणं दिसत नसली तरी बरं झाल्यानंतर पोस्ट रिकव्हरी सिम्पटम्स गंभीर असण्याची शक्यता आहे.