Delhi Case : मुंबईत काम करणाऱ्या तरुणीची दिल्लीत प्रियकराकडून हत्या
मुंबईत कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीची दिल्लीत प्रियकराने हत्या केल्याचं समोर आलंय.. तब्बल सहा महिन्यांनंतर ही घटना उघडकीस आली असून आरोपीला अटक करण्यात आलीय.. प्रियकरानं प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन जंगलात फेकून दिल्याचा आरोप आहे.. आफताब आणि श्रद्धा मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते.. एकत्र काम करता करता दोघांची मैत्री झाली.. त्यानंतर याच मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.. मात्र या प्रेमाला घरातून विरोध असल्याने दोघंही दिल्लीत पळून आले...यानंतर श्रद्धाचे कुटुंबीय सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे माहिती घेत होते.. मात्र सोशल मीडियावर श्रद्धाकडून अपडेट येणं बंद झालं त्यावेळी तिचे वडील दिल्लीत पोहोचले... या प्रकरणी त्यांनी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली.. पोलिसांनी कसून तपास करत आफताबला अटक केली.. कसून चौकशी केली असता श्रद्धाची हत्या केल्याची कबुली त्याने दिलीय.. श्रद्धा लग्नासाठी दबाव टाकत होती आणि यावरुन वारंवार खटके उडत असल्याने तिची हत्या केल्याचं आफताबने पोलिसांना सांगितलंय.. हत्येनंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले... हे तुकडे ठेवण्यासाठी त्याने फ्रीज खरेदी केला.. त्यानंतर जवळपास १८ दिवस हे तुकडे एकेक करुन महरौलीतील जंगलात फेकून दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर येतेय...