JNU Violence | JNU मधील हल्ल्यातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे : मनोज तिवारी | ABP Majha

Continues below advertisement
जेएनयूतल्या साबरमती हॉस्टेलमध्ये काल तोंड झाकून आणि हातात लाठ्या-काठ्या घेऊन अज्ञातांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केलाय. त्यात जेएनयू विद्यार्थी संघाची अध्यक्षा आयेशी घोषसह १८ जण गंभीर जखमी झालेत...जखमींना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल कऱण्यात आलंय.हातात लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या जमावानं हॉस्टेलचीही तोडफोड केलीए.  एम्समध्ये दाखल जखमी विद्यार्थ्यांची रात्री उशिरा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी विचारपूस केली... दरम्यान, या हल्ल्यावरुन डावे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेत. तर गृहमंत्री अमित शाहांनी या हल्ल्याची गंभीर दखल घेतली असून दिल्ली पोलिसांकडून घटनेचा अहवाल मागितला आहे... दुसरीकडे या राड्याप्रकरणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सचिवांनी जेएनयूचे कुलसचिव, प्रॉक्टर आणि रेक्टर यांना बोलावून घेतलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram