भाजप खा.बाबुल सुप्रियो यांचा राजकारणातून संन्यास,कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याची फेसबुक पोस्ट
नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. बाबुल सुप्रियो आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, राजकरणात न राहता देखील ते सामाजिक कार्य करू शकतात. ते कोणत्याही पक्षात जाणर नाही. पुढे म्हणाले की टीएमसी, कॉंग्रेस किंवा सीपीएम कोणत्याही पक्षाने त्यांना बोलावले नाही. भाजपला हा एक मोठा धक्का मानला जातो आहे.
आसनसोल लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, "मी कोणत्याही पक्षात जाणार नाहीये. मला कोणत्या पक्षाने बोलावलेले नाही. मी कुठेही जाणार नाही. समाजसेवा करण्यासाठी राजकरणात असण्याची आवश्यकता नाही."
Tags :
Babul Supriyo Bjp Mp Union Minister Former Union Minister BJP Politics Babul Supriyo Exits Politics Babul Supriyo BJP MP Bengal MP West Bengal Politician Singer Babur Supriyo