Ashish Shelar PC | महाविकासआघाडीमधील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन : आशिष शेलार

Continues below advertisement

मुंबई : दिल्लीत (Delhi Farmers Protest) सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला देशाच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच मंगळवारी एक वेगळं वळण मिळालं. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये एकच हिंसा उसळली आणि पोलीस, सुरक्षा यंत्रणांशी शेतकऱ्यांचा संघर्ष पाहून सारा देश हादरला. याच मुद्द्यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना उद्देशून काही प्रश्नही केले.

महाविकासआघाडीवर निशाणा साधत शेलार म्हणाले, दिल्लीच्या घटनेत पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्यात आला. त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्यांनी हे प्रकार केले त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील नेत्यांनी एक चकार शब्द काढला नाही. 'महाष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष दिल्ली आंदोलनाच्या हिसेंचं समर्थन करत आहेत. ज्यांनी या आंदोलनात हिंसा केली त्यांच्याविरोधात यांनी एक चकार शब्द काढला नाही. मात्र महाविकासआघाडीमधील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन केलं गेलं. अरे कुठे फेडाल ही पापं…?', अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram