Biporjoy Cyclone Live Updates : गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार बिपरजॉय, धडकी भरवणारी दृष्य

Continues below advertisement

बिपरजॉय चक्रीवादळ आज संध्याकाळी उशिरा गुजरातवर धडकणार आहे. हे चक्रीवादळ सध्या किनाऱ्यापासून १८० किलोमीटरवर आहे. ५ ते ६ किलोमीटर प्रति तास वेगानं ते गुजरातकडे सरकतंय. बिपरजॉय आता समुद्रात ज्या ठिकाणी आहे, तिथं वाऱ्याचा वेग ताशी १२० किलोमीटर एवढा आहे. गुजरातमध्ये लँडफॉल झाल्यावर ताशी १२० ते १४५ किलोमीटर इतक्या भयंकर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून तब्बल ७४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हललण्यात आलं आहे. गुजरातमध्ये NDRFच्या १८ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. लष्कर, नौदल आणि वायुदलाची देखील मदत घेण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram